नांदेड :
गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु सरकार स्थापन होताच दिलेले आश्वासन विसरून सरसकट कर्जमाफी न करता तत्वतः व अंशतः कर्जमाफी मान्य करीत नियमांच्या जंजाळात अडकवून फसवणूक केली, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला.
सोमवारी शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला खासदार शेट्टी मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राजगोरे, स्वागताध्यक्ष तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, मराठवाडा अध्यक्ष सुबोध मोहिते, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हनमंत राजगोरे, देवेंद्र भुयार व किशोर ढगे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या संघटित शक्ती व चळवळीची गरज उसाचे पैसे एफआरपी प्रमाणे व एक रक्कमी खात्यावर मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटित शक्ती व चळवळीची आवश्यकता असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे पैसे ऊस नेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत न मिळाल्यास कारखाना जप्ती करून लिलावाद्वारे आलेल्या रकमेतून पैसे अदा करण्याची कायद्यात तरतूद असल्याचा उल्लेख करीत खा. शेट्टी यांनी आवश्यकता पडल्यास रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढा लढणार, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.








No comments:
Post a Comment