गुजरातचाही न्याय करा !
लोकमत संपादकीय -
१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या झालेल्या खुनानंतर दिल्लीत उसळलेल्या प्रक्षोभात चार हजार शिखांची कत्तल झाली. या खटल्याचा निकाल लांबत जाऊन तो परवा लागला आणि त्यात सज्जनकुमारसह त्याच्या काही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. मुळात हा खटला एवढी वर्षे का लांबला आणि देशात सामूहिक हत्याकांडाचे खटले निकालात का निघत नाहीत, याची चर्चा असतानाच हा निकाल आला ही गोष्ट चांगली झाली. आता याच झपाट्यात सर्वोच्च न्यायालय आणि संबंधित न्यायालयांनी २००२ मध्ये गुजरातेत झालेल्या मुसलमानविरोधी दंगलींच्या व त्यात मारल्या गेलेल्या दोन हजार निरपराध नागरिकांना व तेथे सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या शेकडो स्त्रियांनाही न्याय द्यावा, असेच कुणाच्याही मनात यावे. गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्टÑात उसळलेल्या ब्राह्मणविरोधी दंगली आता इतिहासजमा झाल्या असून, त्याची आठवण येथे काढण्याचे कारण नाही, परंतु गुजरातमधील दंगलींना आता १६ वर्षे झाली. त्यात मरणाºयांची व बलात्काºयांची संख्या अनुक्रमे हजार व शेकड्यांच्या घरात जाणारी आहे.
या दंगली सुरू असतानाचे गुजरातचे राज्यकर्ते आता देशाचे राज्यकर्ते आहेत आणि त्या दंगलीत तडीपार म्हणून घोषित झालेला इसम देशाच्या सत्तारूढ पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यात कित्येक मंत्र्यांना २८ वर्षांच्या सश्रम कारावासाची, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीही गेली आहे, परंतु त्या खटल्याचे काम अजून रेंगाळल्याने ही गुन्हेगार माणसे तुरुंगाबाहेर व मजेत आहेत. ही दंगल उसळली, तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदावर भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी हे होते. त्यांनी दंगलग्रस्त भागांना भेट देऊ नये, अशी तेव्हाच्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. त्यातून त्यांना काहीतरी दडवायचे होते, हेच साºयांना तेव्हा वाटले. तरीही वाजपेयींनी त्या भागांना भेट दिली. त्या वेळी त्यांच्यासोबत जायला त्या मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. दंगलग्रस्त प्रदेश व त्यात मारले जाणारे लोक यांना सरकार योग्य ते संरक्षण देत नाही, हे दिसल्यानंतर वाजपेयींनी त्या मुख्यमंत्र्यांना ‘राजधर्म पाळा’ असा सल्ला जाहीरपणे दिला. तेवढ्यावर न थांबता, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून घालवा, असा आग्रहही वाजपेयींनी धरला, परंतु लालकृष्ण अडवाणी यांचे अतिरेकी हिंदुत्व आणि कडवा मुस्लीमद्वेष त्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूने उभा राहिला. परिणामी, वाजपेयींनाच त्यांचा आग्रह मागे घेणे भाग पडले. नंतरच्या काळात त्या दंगलीच्या ज्या बातम्या बाहेर आल्या, त्या अंगावर शहारे आणणाºया होत्या. हजारो लोक निर्वासित झाले, हजारोंचे व्यवसाय नेस्तनाबूत झाले. स्त्रिया बलात्काराला बळी पडल्या आणि शेकडो माणसांची प्रेते रस्त्यात पडून राहिली. हल्लेखोरांना संरक्षण द्या, त्यांच्यापासून कुणाला वाचवू नका, यासारखे उफराटे आदेश राज्याचे गृहमंत्रालयच पोलिसांना देताना दिसले. साºयात संतापजनक बाब ही की, हल्लेखोरांच्या पाठीशी तिथले सरकार तेव्हा उभे होते. ज्या अधिकाºयांनी बळींच्या बाजूने उभे होण्याचा प्रयत्न केला, त्यांना एक तर काढून टाकले गेले किंवा त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. काहींना सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. परिणामी, मुख्यमंत्री मोदी यांची प्रतिमा अडवाणींच्या कडव्या प्रतिमेहून अधिक टोकाची व धारदार झाली. त्या हत्याकांडाच्या जखमा अजून ताज्या आहेत. त्यातले बळी अजून अशांत आहेत आणि ज्यांनी त्यांना आयुष्यातून उठविले, ते देशाचे सत्ताधारी आहेत. या स्थितीत त्या हत्याकांडाचे खटले लांबत ठेवणे, न्यायाधीशांवर दडपण आणणे, त्यातल्या काहींना बेपत्ता करणे संबंधितांना शक्य आहे. ज्या खासदारांची साºयांसमक्ष हल्लेखोरांनी जाळून हत्या केली, ते हल्लेखोर कोर्टातून निर्दोष सुटलेले देशाने पाहिले आहेत. आपल्या देशात एकाची हत्या करणारा खुनी होतो, तर अनेकांची हत्या करणारा नेता होतो, हे आपले चमत्कारिक वास्तव आहे. त्याचमुळे दिल्लीतील हत्याकांडाच्या निकालाने आता अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्या हत्याकांडातील आरोपींना जशा शिक्षा झाल्या, तशाच आता गुजरातमधील दंगेखोरांना व खुनी माणसांनाही त्या होतील, असे अनेक न्यायप्रेमी लोकांना वाटू लागले आहे. ते खटले आणि दीर्घकाळ रखडलेले ते खटलेही निकालापर्यंत जावे. देशात न्याय आहे आणि तो सर्वांसाठी सारखा आहे, याचा अनुभव जनतेला यावा, अशीच साºयांची अपेक्षा आहे.
एका प्रसंगात तर एक महिला मंत्रीच हल्लेखोरांना रॉकेलचे डबे पुरविताना आढळल्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ते दुसरे सर्वात मोठे आणि भीषण हत्याकांड होते आणि त्याला धार्मिक कडा होत्या.
बुलंदशहर हिंसाचारात बजरंग दलाचा नेता मुख्य आरोपी
योगेश राज असे या बजरंग दलाच्या नेत्याचे नाव असून तो बजरंग दलाच्या संयोजक पदावर कार्यरत आहे. पोलिसांनी ९० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २७ लोकांची नावे यात नमूद करण्यात आली आहे. तर ५० ते ६० अज्ञांत लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हिंसाचारप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुभाष चंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी योगेश राजने जमावाला भडकावले. हिंसाचार करण्यासाठी चेतवल्याने जमावाने उद्रेक केला. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. दगडफेक केली, गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
योगेश राजने पोलीस स्टेशनमध्ये जावून गोहत्येच्या संशयावरून ७ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. बुलंदशहरात तणाव असून या ठिकाणी जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
विहिंप, आरएसएस आणि बजरंग दलानेच बुलंदशहरमध्ये रचला दंगलीचा कट – भाजपा नेता
यात काही भाजपाच्या लोकांचाही समावेश असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

ओ. पी. राजभर
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधील स्यानात भडकलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि बजरंग दलाचा हात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील भाजपा नेते आणि मंत्री ओ. पी. राजभर यांनी केला आहे. राजभर म्हणाले, विहिंप, बजरंग दल आणि आरएसएसने बुलंदशहरमध्ये हिंसाचारासाठी षडयंत्र रचले होते. तसेच पोलिसही काही भाजपाच्या सदस्यांची नावे घेत आहेत. यावरुन यात काही भाजपाच्या लोकांचाही समावेश असावा असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्या दिवशी मुस्लिम इज्तेमाचा कार्यक्रम होता त्याच दिवशी हा हिंसाचार कसा झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावरुन हा बुलंदशहराची शांती भंग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे योगी सरकारच्या मंत्र्यानेच भाजपा आणि त्यांच्या संलग्न संघटनांवर गंभीर आरोप केल्याने आता सरकारची अडचण झाली आहे.
गोमांसाच्या संशयावरुन सोमवारी स्यानामध्ये झालेल्या हिंसाचारात पोलीस निरिक्षक सुबोधकुमार सिंह यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या हिंसाचारात एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.
यवतमाळ जिल्ह्यातील भूतस्करीमध्ये राजकीय शक्तींचा सहभाग
गेल्या महिन्याभरात यवतमाळ जिल्ह्य़ात भूमाफियांनी केलेल्या भू तस्करीमध्ये अनेक सर्वसामान्य व्यक्तींना नाडवल्या गेले, फसवले गेले.मात्र पकडल्या गेलेल्या आरोपींमध्ये आतापर्यंत दलालीशी संबंधित माणसांचा सहभाग आढळला. आता मात्र आरोपींमध्ये राजकीय शक्तींचा स्वतः सहभाग आढळला आहे.याशिवाय हे लोन यवतमाळ शहरा वतिरिक्त पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्याचे सिद्ध झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरात एका राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष असलेल्या व एका प्रतिथयश जनहीतकारी संस्थेचा प्रमुख असलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या आई व बहिणीला फसवून त्यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या नावाचे खोटे संमतीपत्र सादर करून वडिलोपार्जित कोट्यवधीची संपत्ती हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणा शिवाय सदर व्यक्तीने आपल्या संस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीला कर्मचारी दाखवू न तिच्या नावे मोठमोठी कर्ज उचल केली आहे. शहराच्या नावावर असलेल्या एका अर्बन बँकेशी असलेल्या घरोब्यामुळे सदर कर्ज प्रकरणे यशस्वीरित्या हाताळले गेले असले तरी मात्र सदर कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून शहरात वास्तव्य न करता नागपूर येथे वास्तव्य करीत असल्याने सदर कर्मचारी हा अवैधपणे या संस्थेत कार्यरत असल्याचे सिद्ध होते .शिक्षण विभागाने या संबंधात चौकशी करून व विद्यार्थ्यांचे बयान घेतल्यास हा खोटेपणा उघड पडल्याशिवाय राहणार नाही .
संपादकीय
माझ्या नवयुवक विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार या मंचावर आपल्याशी हितगुज करीत असताना मला खरोखरच अत्यंत आनंद होत आहे मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी असताना नोकरी मिळविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. दहावीपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळेत व त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान घेत घेतल। मात्र खूप मेहनत करूनही प्रथम श्रेणी घेऊ शकलो नाही.अशाही स्थितीत अभियांत्रिकीच्या पदविकेला प्रवेश मिळाला मात्र सदर शिक्षणाचा पाया कच्चा असल्याने भोकं पट्टी शिवाय पर्याय नव्हता अशाही स्थितीत फायनलपर्यंत पोहोचला अखेरच्या सत्रात मात्र काही विषयात शकलो त्यानंतर मात्र कला शाखेकडे वळू व पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो .या सर्व प्रवासात नोकरीच्या संधी केवळ स्पर्धा परिक्षेच्या शिवाय अन्यत्र नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.त्या काळात केवळ वर्तमान पत्राशिवाय या संधीची माहिती अन्यत्र दुसरीकडून मिळत नव्हती. आज मात्र तंत्रज्ञानाचा एवढा विस्तार झाला आहे की सर्व माहितीचा खजाना आपल्या हातात एका स्मार्टफोनवर उपलब्ध झाला आह. यास्तव विद्यार्थी मित्रांसाठी समाजऋणाची उतराई करण्याच्या उद्देशाने आम्ही या अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू झालो मला आशा आहे आपण या प्रयत्नाला शुभेच्छा त्यासोबतच यात आणखी काय काय अपेक्षित आहे याबाबत आम्हाला सूचना कराल अशी विनंती करतो. संपादक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली
नांदेड :
गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात सत्तेत आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु सरकार स्थापन होताच दिलेले आश्वासन विसरून सरसकट कर्जमाफी न करता तत्वतः व अंशतः कर्जमाफी मान्य करीत नियमांच्या जंजाळात अडकवून फसवणूक केली, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला.
सोमवारी शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला खासदार शेट्टी मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राजगोरे, स्वागताध्यक्ष तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, मराठवाडा अध्यक्ष सुबोध मोहिते, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हनमंत राजगोरे, देवेंद्र भुयार व किशोर ढगे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या संघटित शक्ती व चळवळीची गरज उसाचे पैसे एफआरपी प्रमाणे व एक रक्कमी खात्यावर मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटित शक्ती व चळवळीची आवश्यकता असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांचे पैसे ऊस नेल्यानंतर चौदा दिवसांच्या आत न मिळाल्यास कारखाना जप्ती करून लिलावाद्वारे आलेल्या रकमेतून पैसे अदा करण्याची कायद्यात तरतूद असल्याचा उल्लेख करीत खा. शेट्टी यांनी आवश्यकता पडल्यास रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढा लढणार, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात
राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात; १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ
राज्यातील पहिला संविधान व बुद्धिस्ट थीम पार्क नागपुरात; १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ
|
संविधानाच्या उद्देशिकेची नोंद असलेला शिलालेख उभारणारी पहिलीच महापालिका
|
|
नागपूर
|
संविधानाविषयी जनजागृती करतानाच नागपूर महानगरपालिकेतर्फे राज्यातील पहिल्या संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कची उभारणी करण्यात येत आहे. १५ फूट उंचीचा अशोक स्तंभ, म्युरलमधून आंबेडकरांचे चरित्रदर्शन हे या पार्कचे वैशिष्ट्य राहाणार आहे.
नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी सामाजिक जाणिवेतून संविधान पार्कची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे, यापूर्वी या परिसरात १८ फूट उंचीचा आकर्षक संविधान शिलालेख उभारण्यात आला आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची नोंद असलेला शिलालेख उभारणारी नागपूर महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका आहे, हे विशेष. हा शिलालेख पाहायला दूरवरून लोक भेट देतात. यासोबतच संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर शिलालेखाच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.५० लाखांची तरतूद : नागपूर महानगरपालिकेचे विद्यमान स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा व माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी या संविधान पार्कसाठी उपलब्ध करून दिला आहे. या वास्तूचे वास्तुशिल्पकार आर्किटेक्ट उदय गजभिये यांनी या संविधान व बुद्धिस्ट थीम पार्कचे आकर्षक डिझाइन तयार केले आहे. या संविधान पार्कच्या हिरवळीवर संविधान व राजमुद्रा असलेला १५ फूट उंच अशोक स्तंभ उभारण्यात येणार आहे. म्युरलमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रदर्शन या संविधान पार्कच्या मध्यमागी सुंदर आकर्षक लॉन असून सभोवती भगवान बुद्ध व संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र दर्शवणारे ७ म्युरल तसेच २२ प्रतिज्ञा व बाबासाहेबांचे मौलिक विचार तैलचित्राद्वारे दर्शवण्यात येणार आहे. याशिवाय एका बाजूला भव्य मंच उभारण्यात येत असून त्यावर आकर्षक थाई व जपानी वास्तुकलेचा भव्य पॅगोडा उभारण्यात येणार आहे. परिसरात ध्यानसाधनेसाठी सभागृह, ग्रीन जिमही तयार करण्यात येणार आहे. परिसरातील 'वॉटर फाउंटन टँक'मध्ये भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. |






















