संपादकीय

माझ्या नवयुवक विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सप्रेम नमस्कार या मंचावर आपल्याशी हितगुज करीत असताना मला खरोखरच अत्यंत आनंद होत आहे मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी असताना नोकरी मिळविण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. दहावीपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळेत व त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान घेत घेतल। मात्र खूप मेहनत करूनही प्रथम श्रेणी घेऊ शकलो नाही.अशाही स्थितीत अभियांत्रिकीच्या पदविकेला प्रवेश मिळाला मात्र सदर शिक्षणाचा पाया कच्चा असल्याने भोकं पट्टी शिवाय पर्याय नव्हता अशाही स्थितीत फायनलपर्यंत पोहोचला अखेरच्या सत्रात मात्र काही विषयात शकलो त्यानंतर मात्र कला शाखेकडे वळू व पदव्युत्तर शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो .या सर्व प्रवासात नोकरीच्या संधी केवळ स्पर्धा परिक्षेच्या शिवाय अन्यत्र नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.त्या काळात केवळ वर्तमान पत्राशिवाय या संधीची माहिती अन्यत्र दुसरीकडून मिळत नव्हती. आज मात्र  तंत्रज्ञानाचा एवढा विस्तार झाला आहे की सर्व माहितीचा खजाना आपल्या हातात एका स्मार्टफोनवर उपलब्ध झाला आह. यास्तव विद्यार्थी मित्रांसाठी समाजऋणाची उतराई करण्याच्या उद्देशाने आम्ही या अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू झालो मला आशा आहे आपण या प्रयत्नाला शुभेच्छा त्यासोबतच यात आणखी काय काय अपेक्षित आहे याबाबत आम्हाला सूचना कराल अशी विनंती करतो. संपादक
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive