यवतमाळ जिल्ह्यातील भूतस्करीमध्ये राजकीय शक्तींचा सहभाग

गेल्या महिन्याभरात यवतमाळ जिल्ह्य़ात भूमाफियांनी केलेल्या भू तस्करीमध्ये अनेक सर्वसामान्य व्यक्तींना नाडवल्या गेले, फसवले गेले.मात्र पकडल्या गेलेल्या आरोपींमध्ये आतापर्यंत दलालीशी संबंधित माणसांचा सहभाग आढळला. आता मात्र आरोपींमध्ये  राजकीय शक्तींचा स्वतः सहभाग आढळला आहे.याशिवाय हे लोन यवतमाळ शहरा वतिरिक्त पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्याचे सिद्ध झाले आहे . मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरात एका राजकीय पक्षाचा शहर अध्यक्ष असलेल्या व एका प्रतिथयश जनहीतकारी संस्थेचा प्रमुख असलेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या आई व बहिणीला फसवून त्यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या नावाचे खोटे संमतीपत्र सादर करून वडिलोपार्जित कोट्यवधीची संपत्ती हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणा शिवाय सदर व्यक्तीने आपल्या संस्थेमध्ये स्वतःच्या पत्नीला कर्मचारी दाखवू न तिच्या नावे मोठमोठी कर्ज उचल केली आहे. शहराच्या नावावर असलेल्या एका अर्बन बँकेशी असलेल्या घरोब्यामुळे सदर कर्ज प्रकरणे यशस्वीरित्या हाताळले गेले असले तरी मात्र सदर कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून शहरात वास्तव्य न करता नागपूर येथे वास्तव्य करीत असल्याने सदर कर्मचारी हा अवैधपणे  या संस्थेत कार्यरत असल्याचे सिद्ध होते .शिक्षण विभागाने या संबंधात चौकशी करून व विद्यार्थ्यांचे बयान घेतल्यास हा खोटेपणा उघड पडल्याशिवाय राहणार नाही .
Share:

No comments:

Post a Comment

Popular Posts

Blog Archive